तालुका स्तरावर बैठकांचं आयोजन : या परिषदेमध्ये नंदुरबार जिल्ह्यातल्या सहाही तालुक्यासह धुळे जिल्ह्यातील साक्री आणि दोडांईचा परिसरातील मंदिरांचे पुजारी, विश्वस्त, अर्चक उपस्थित होते. तीन सत्रात या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात मुख्य म्हणजे मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करावा या विषयावर चर्चा झाली आणि उपस्थितांचे मत जाणून घेण्यात आलं. तसंच, या परिषदेत जिल्ह्यातील प्रमुख मंदिरांमध्ये येत्या काही दिवसांतच वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी आता तालुका स्तरावर बैठकांचं आयोजन केलं जाणार आहे.
वस्त्रसंहितेचा ठराव सर्वानुमते मंजूर : नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील मंदिर विश्वस्त, पुजारी व अर्चक या परिषदेत मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी, महाराष्ट्र न्यास परिषदेचे प्रशांत कुलकर्णी यांनी या ठरावाबाबत उपस्थितांचं म्हणणं ऐकून मंदिरात प्रवेशासाठी वस्त्रसंहिता लागू करणं गरजेचं आहे, यावर मत जाणून घेतलं असता उपस्थतांनी एकमतानं होकार देऊन पाठिंबा दिला आहे. तसंच, नंदुरबार जिल्ह्यासह लगतचा साखरी तालुका व दोंडाईचा येथील मंदिर विश्वस्तांनी व पुजाऱ्यांनी या ठरावाला पाठिंबा दिला असून लवकरच याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आलंय.
Post a Comment