Top News

मस्साजोग येथील हत्याकांड प्रकरणी तीव्र निषेध; धरणगावमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन.


धरणगाव – मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्घृण हत्येप्रकरणी मुख्य आरोपी वाल्मीक कराड याला फाशीची शिक्षा व्हावी आणि गुन्ह्यात सामील इतर आरोपींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी आज धरणगाव येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध आंदोलन केले.

धरणगावमधील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ आज (दि. ४ मार्च) दुपारी ४ वाजता महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने जमले होते. या वेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि दोषींना तात्काळ कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. 


महायुतीच्या नेत्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "या हत्याकांडातील आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली नाही, तर महायुती रस्त्यावर उतरून आणखी तीव्र आंदोलन करेल."

या निषेध आंदोलनात महायुतीतील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी (शिंदे-फडणवीस-पवार गट)च्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. पोलिस प्रशासनानेही या आंदोलनावर लक्ष ठेवले होते.

Post a Comment

Previous Post Next Post