09059/60 उधना-खुर्दा रोड एक्सप्रेसला धरणगाव येथे पुन्हा थांबा मिळाला
धरणगाव आणि परिसरातील रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. पूर्वीची सुरत-ब्रह्मपूर साप्ताहिक एक्सप्रेस असलेली 09059/60 उधना-खुर्दा रोड एक्सप्रेसला धरणगाव येथे पुन्हा थांबा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे धरणगावसह खान्देशातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या महत्त्वाच्या निर्णयासाठी मा. खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, तसेच खान्देश प्रवासी असोसिएशन, धरणगाव यांचे मोलाचे योगदान असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे हा थांबा पुन्हा मंजूर करण्यात आला आहे.
गाडीचे वेळापत्रक:
▶ 09059 उधना-खुर्दा रोड एक्सप्रेस
सुरुवात 12 मार्च 2025 पासून
धरणगावहून नंदुरबार-सुरत मार्गे प्रवास
दर शनिवार सकाळी 10:11 वाजता धरणगावहून प्रस्थान
▶ 09060 खुर्दा रोड-उधना एक्सप्रेस
धरणगावमार्गे जळगाव-भुसावळ-अकोला-वर्धा-नागपूर-ब्रह्मपूर, खुर्दा रोड
दर बुधवार संध्याकाळी 5:57 वाजता धरणगावहून प्रस्थान
ही गाडी 2 मे 2025 पर्यंत धावणार असल्याने प्रवाशांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन खान्देश प्रवासी असोसिएशनचे अध्यक्ष कमलेशदादा तिवारी, उपाध्यक्ष चंद्रकांत भावसार, सचिव श्रेयांस जैन, सहसचिव अॅड. नंदन पाटील, खजिनदार प्रतीक जैन, तसेच सदस्य युवराज रायपूरकर, दिनेश पाटील, प्रशांत भाटिया, नारायण महाजन, संभाजी सोनवणे आणि जतीन नगारिया यांनी केले आहे.
ताप्ती गंगा एक्सप्रेससाठीही सकारात्मक संकेत!
याशिवाय, 19045/46 ताप्ती गंगा एक्सप्रेसला धरणगाव येथे थांबा मिळावा यासाठीही सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, केंद्रीय रेल्वेमंत्री मा. अश्विनी वैष्णव यांच्याकडून सकारात्मक संकेत देण्यात आले आहेत. हा थांबा लवकरच मंजूर होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
धरणगावसाठी रेल्वेसेवेत मोठी सुधारणा
धरणगाव येथील प्रवाशांसाठी ही दोन्ही गाड्या अत्यंत महत्त्वाच्या असून, या थांब्यांमुळे खान्देशातील प्रवाशांचे रेल्वे प्रवास अधिक सोयीस्कर होईल.
या निर्णयाबद्दल मा. खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, तसेच सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार!
Post a Comment