धरणगावात शिवजयंती निमित्त प्रबोधनपर व्याख्यान संपन्न..
धरणगाव : सर्व जाती-धर्मातील मावळ्यांना समान न्याय देत सामाजिक क्रांतीचा पाया रचणारे छत्रपती शिवराय हे अखंड भारताचे आराध्य दैवत असल्याचे प्रतिपादन शिवव्याख्याते संजीव सोनवणे यांनी व्यक्त केले.
धरणगाव येथील उबाठा शिवसेना पक्षाच्या वतीने कोट बाजार येथील साने पटांगणावर शिवजन्मोत्सवानिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्याप्रसंगी व्याख्याते श्री. सोनवणे बोलत होते. आपल्या प्रबोधनातुन त्यांनी शिव छत्रपती शिवरायांपासुन अफझलखानाचा वध व धर्मवीर संभाजी राजे पर्यंतचा अंगावर शहारे आणणारा प्रसंग सादर केला. ते पुढे म्हणाले की, जाती धर्माच्या भिंती भेदून, माणसाला माणुसकीने जगायला शिकविणारे राज्य म्हणजे शिवरायांचे स्वराज्य होते. अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज होते. अमावस्येच्या रात्री लढाया करून त्या सर्वच्या सर्व लढाया जिकणारे, अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देणारे चिकित्सक व बलात्कारी व अत्याचाराचा विरुद्ध लढा पुकारणारे शिवबा राजे होते. साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराजांनी सुरू केलेली शिवकालीन पाणी साठवण व्यवस्था आजही प्रभावी आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी दळण-वळणाची साधने नसताना अभेद्य असे शंभराहून अधिक गडकिल्ल्यांचे निर्माते छत्रपती शिवराय होते. अतिशय धुर्त व गमिनी काव्यातुन वेळोवेळी तह करून युध्दनितीचा वापर करत मोगलांवर विजय मिळवत सुराज्य ते स्वराज्य स्थापना केली. शिवरायांचा सैन्यात अठरापगड जातीचे मावळे होते. सर्वाना समान न्याय हक्कातुन शिवराय हेच जगातील आदर्श राजा होते अशी आठवण करून दिली. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून व शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रास्ताविकात शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी कार्यक्रमाची रुपरेषा सादर केली व उपस्थित मान्यवरांचा शिवसेना शहर शाखेच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात केला.
किरण अग्निहोत्री यांनी सुत्रसंचलन तर आभार ॲड. शरद माळी यांनी मानले, सदर कार्यक्रमात उबाठा शिवसेनेचे जिल्हासंपर्क प्रमुख संजय सांवत, जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील, दिपकसिंह राजपुत, भाऊसाहेब सोनवणे, विजय राठोड, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, जिवन बयस, निलेश चौधरी, महिला जिल्हाप्रमुख महानंदाताई पाटील, शहरप्रमुख भागवत चौधरी, प्रा.डी आर पाटील, डाॅ.संजीवकुमार सोनवणे, जानकीराम पाटील, जयदीप पाटील, दिपक सोनवणे, धनराज माळी, रविंद्र भिला पाटील, पी एम पाटील, लक्ष्मण पाटील, ॲड.वसंतराव भोलाणे, उषाताई वाघ, किर्ती मराठे, बापू माळी, कृपाराम माळी, परमेश्वर माळी, लक्ष्मण माळी या प्रसंगी गावातील सर्वच समाज अध्यक्ष व संचालक मंडळ तसेच गावातील आर्थिक संस्था अध्यक्ष व संचालक मंडळ उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाने पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
Post a Comment