Top News

औरंगजेबाच्या कबर हटवण्याची मागणी; विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे तहसीलदारांना निवेदन.


धरणगाव, १८ मार्च (किरण माळी) – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या औरंगजेबाच्या कबर तातडीने हटवावी, या मागणीसाठी धरणगाव तालुक्यात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

या वेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी औरंगजेबाच्या कबरीचे अस्तित्व भारतीय इतिहासाच्या अभिमानास ठेच पोहोचवणारे असल्याचे सांगितले. तसेच, ही कबर पर्यटनस्थळ म्हणून विकसित होणे हा राष्ट्रनिष्ठ भारतीयांच्या अस्मितेचा अपमान असल्याचा आरोप केला.

निवेदन देताना बजरंग दलाचे तालुकाध्यक्ष, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आणि इतर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने याबाबत तातडीने कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post