धरणगाव, प्रतिनिधी
स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी महाराष्ट्रभर भ्रमंती करणारे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ब्रँड अँबेसिडर यशवंतराव कन्हेरे यांनी धरणगाव येथे भेट दिली. या वेळी त्यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आणि नागरिकांना स्वच्छता अभियानात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले.
त्यांच्या आगमनाच्या निमित्ताने सोमवंशी आर्य क्षत्रिय गाडी लोहार (जिनगर) समाजातर्फे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. समाजाचे अध्यक्ष सुरेशआण्णा भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी रविंद्र भागवत, विनायक बागुल, सुभाष भागवत, दिलीप भागवत, शिरिष भागवत, मयूर बागुल, सुदर्शन भागवत, सचिन भागवत, शेखर भागवत, रविंद्र बागुल, आनंद भागवत, गोपाल भागवत, सचिन बागुल, राजेश बागुल, रुपेश भागवत, सुनिल भागवत, शुभम बागुल, भूषण भागवत, गौरव भागवत आदी समाजबांधव उपस्थित होते.
यशवंतराव कन्हेरे यांच्या स्वच्छता अभियानातील कार्याची प्रशंसा करत समाजाच्या वतीने त्यांच्या पुढील वाटचालीस सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.
Post a Comment