Top News

नवीन वीज मीटर बसवण्यासाठी लाच घेताना सहायक अभियंता रंगेहात


चोपडा (जळगाव): नवीन वीज मीटर बसवण्यासाठी ५५०० रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या महावितरणच्या सहायक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एलपीव्ही) पथकाने ४५०० रुपये स्वीकारताना रंगेहात अटक केली. ही कारवाई मंगळवारी (१२ मार्च) चोपडा शहरात करण्यात आली.

काय आहे प्रकरण?

चोपडा येथील तक्रारदाराने आपल्या घरी नवीन वीज मीटर बसवून देण्यासाठी महावितरणच्या सहायक अभियंता अमित दिलीप सुलक्षणे (वय ३५, रा. प्लॉट नं. ६०, बोरोले १, चोपडा) यांनी ५५०० रुपयांची लाच मागितली, असा आरोप केला होता. तक्रारदाराने ११ मार्च रोजी एलपीव्हीच्या जळगाव युनिटकडे तक्रार नोंदवली.

पडताळणी केल्यानंतर अभियंता सुलक्षणे यांनी तडजोडीअंती ४५०० रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली. ठरलेल्या प्रमाणे, १२ मार्च रोजी लाच स्वीकारताना एलपीव्हीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.

एलपीव्ही पथकाची कारवाई

या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

सापळा पथक:

  • मार्गदर्शक अधिकारी: मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परीक्षेत्र.
  • पर्यवेक्षण अधिकारी: श्री योगेश ठाकूर, पोलीस उपअधीक्षक, जळगाव विभाग.
  • सापळा व तपास अधिकारी: श्रीमती नेत्रा जाधव, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव.
  • सापळा कार्यवाही पथक: श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, पोलीस कॉन्स्टेबल प्रणेश ठाकूर, पो. ना. मराठे, पो. ना. राकेश दुसाने.

नागरिकांना आवाहन

कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे संपर्क साधावा.

  • टोल फ्री क्रमांक: १०६४


Post a Comment

Previous Post Next Post