Top News

धरणगाव येथे हॉलिडे एक्सप्रेसच्या थांब्यासाठी खासदार स्मिताताई वाघ यांना निवेदन.

धरणगाव: धरणगाव तालुका प्रवासी मंडळाच्या वतीने हॉलिडे एक्सप्रेससह इतर महत्त्वाच्या गाड्यांना धरणगाव येथे थांबा मिळावा यासाठी खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांना निवेदन देण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष महेंद्र कोठारी, सुनील चौधरी, किरण वाणी यांनी खासदारांची भेट घेऊन ही मागणी मांडली.

पश्चिम रेल्वे तर्फे ०९१२९/०९१३० बांद्रा रिवा एक्सप्रेस, ०९०२५/०९०२६ बलसाड-दानापूर एक्सप्रेस, ०९५७५/०९५७६ राजकोट-महबूबनगर एक्सप्रेस या गाड्या मार्च ते जून या कालावधीत हॉलिडे विशेष म्हणून चालविण्यात येणार आहेत. या गाड्यांना धरणगाव येथे थांबा मिळावा, अशी मागणी प्रवासी मंडळाने केली आहे.

तसेच, ताप्ती गंगा एक्सप्रेस आणि अहमदाबाद-बरौनी एक्सप्रेसला धरणगाव येथे थांबा मिळावा तसेच ताप्ती सेक्शनसाठी पुणे ट्रेन सुरू करावी या जुन्या मागण्यांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. यापूर्वीही या मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले असून, त्यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी प्रवासी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

या निवेदनामुळे धरणगाव रेल्वे स्थानकावरील सुविधा वाढण्यास मदत होईल तसेच प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post