Top News

अखंड हरिनाम सप्ताहाचा तापोपूर्ती सोहळा उत्साहात संपन्न.



हिंदुराष्ट्र फुलपाट, ता. धरणगाव, ११ मार्च २०२५ – धरणगाव तालुक्यातील हिंदुराष्ट्र फुलपाट येथे अखंड हरिनाम सप्ताहाचा तापोपूर्ती सोहळा भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला. संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या सोहळ्याच्या निमित्ताने सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


या सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात ह भ प लखनजी महाराज यांचे प्रभावी कीर्तन झाले. त्यांनी आपल्या कीर्तनातून भक्ती, संस्कार आणि सदाचार यांचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या ओजस्वी प्रवचनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.

कार्यक्रमाला युवा उद्योजक विक्रम गुलाबराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, आणि सरपंच यांनी उपस्थिती लावली. संपूर्ण ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

यावेळी मंडळाकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. भक्तगणांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आणि या पावन सोहळ्याचा आनंद लुटला. तसेच गावातील तरुण मित्र मंडळाने मोठ्या उत्साहाने आणि सेवाभावाने संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

या धार्मिक सोहळ्यामुळे गावात आध्यात्मिक ऊर्जा संचारली असून, ग्रामस्थांनी भविष्यातही असेच कार्यक्रम होत राहावेत अशी इच्छा व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post