Top News

अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या अध्यक्षपदी तुळशीराम पाटील, सचिवपदी शांताराम पाटील यांची निवड


धरणगाव (प्रतिनिधी) – अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या अध्यक्षपदी भोद (ता. धरणगाव) येथील तुळशीराम बळीराम पाटील यांची निवड झाली आहे, तर संघटनेच्या सचिवपदी शांताराम भिका पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयराजे महाडिक व युवा संपर्क प्रमुख जगदीश जाधव यांच्या आदेशानुसार पी. एम. पाटील सर यांनी ही निवड जाहीर केली.

संघटनेच्या कार्यकारिणीतही नव्या नियुक्त्या करण्यात आल्या असून, आधार हरचद पाटील, दिलीप निंबा पाटील, प्रकाश दशरथ पाटील, रमन किसन पाटील आणि प्रदीप भटू पाटील यांची कार्यकारी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल जळगाव जिल्हा अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष पी. एम. पाटील सर, तालुका अध्यक्ष लीलाधर पाटील, जिल्हा सरचिटणीस (महिला) पुष्पाताई पाटील, धरणगाव शहराध्यक्ष दीपक पाटील आदींनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

या निवडीनंतर तुळशीराम पाटील यांनी संघटनेच्या उद्दिष्टांसाठी कार्यरत राहण्याचा संकल्प केला असून, समाजहितासाठी नवनवीन उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post