Top News

उधना-खुर्दा रोड एक्सप्रेसच्या धरणगाव थांब्याचे जल्लोषात स्वागत.


धरणगाव रेल्वे स्थानकावर 09059/60 उधना-खुर्दा रोड (पूर्वीची सुरत-ब्रह्मपूर) साप्ताहिक एक्सप्रेस थांबू लागल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या ऐतिहासिक क्षणानिमित्त धरणगाव स्थानकावर मोठ्या उत्साहात गाडीचे स्वागत करण्यात आले तसेच लोको पायलटचा सत्कार करण्यात आला.
या सेवेसाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या मा. खासदार श्रीमती स्मिता वाघ यांचे खान्देश प्रवासी असोसिएशन व धरणगाववासीयांकडून आभार व्यक्त करण्यात आले.

गाडीची माहिती:

09059 उधना-खुर्दा रोड एक्सप्रेस 12 मार्च 2025 पासून सुरू झाली असून ती 2 मे 2025 पर्यंत धावणार आहे.

धरणगावहून दर शनिवार सकाळी 8:53 वाजता ही गाडी नंदुरबार-सुरत मार्गे धावेल.

09060 उधना-खुर्दा रोड एक्सप्रेस दर बुधवारी दुपारी 4:30 वाजता धरणगावहून जळगाव-भुसावळ-मलकापूर-अकोला-नागपूर-दुर्ग-खुर्दा रोड कडे प्रस्थान करेल.


स्वागत समारंभास मान्यवरांची उपस्थिती

या वेळी भाजपा तालुका अध्यक्ष जिजाबराव पाटील, शहराध्यक्ष दिलीप भाऊ महाजन, तसेच खान्देश प्रवासी असोसिएशनचे अध्यक्ष कमलेशदादा तिवारी, उपाध्यक्ष चंद्रकांत भावसार, सचिव श्रेयांस जैन, सहसचिव ऍड. नंदन पाटील, खजिनदार प्रतीक जैन, आणि सदस्य युवराज रायपूरकर, दिनेश पाटील, प्रशांत भाटिया, नारायण महाजन, संभाजी सोनवणे, जतीन नगारिया यांनी सहभाग घेतला.

प्रवाशांना आवाहन

खान्देश प्रवासी असोसिएशन व धरणगाववासीयांनी जास्तीत जास्त प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

➖➖➖
(किरण माळी –  न्यूज रिपोर्टर)


Post a Comment

Previous Post Next Post