Top News

ग्राम सुधारणा मंडळ साळवे आणि साळवे इंग्रजी विद्यालयाचा अमृत महोत्सव सोहळा १२ मार्चला संपन्न



साळवे (ता. धरणगाव) येथील ग्राम सुधारणा मंडळ आणि साळवे इंग्रजी विद्यालय यंदा अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असून, १२ मार्च २०२५ रोजी भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

चेअरमन डॉ गिरीश नारखेडे 
ग्राम सुधारणा मंडळ साळवे

१९५१ मध्ये दांडी यात्रेच्या वर्धापनदिनी कै. डॉ. देवरामभाऊ नारखेडे आणि शैक्षणिक प्रेमी ग्रामस्थांनी या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. केवळ दहा-बारा विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या शाळेने सातत्याने शैक्षणिक प्रगती साधली आहे. आज या संस्थेच्या अंतर्गत सानेगुरुजी प्राथमिक सेमी इंग्रजी विद्यालय, साळवे इंग्रजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तसेच किमान कौशल्य विभाग कार्यरत आहे. जवळपास ५०० हून अधिक विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत.
खजिनदार 
ग्राम सुधारणा मंडळ साळवे
संस्थेच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानामुळे साळवे विद्यालयाचा निकाल नेहमीच उच्च राहिला असून, एस.एस.सी. परीक्षेत नांदेड केंद्रात पहिल्या क्रमांकाचा मान मिळवत आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संचालक मंडळाच्या प्रयत्नांनी विद्यालयात भव्य इमारती, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, सुवर्णस्मृती सभागृह आणि व्यायामशाळा अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.
डॉ शशिकांत नारखेडे 
शालेय समिती चेअरमन
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या सोहळ्यात माजी विद्यार्थी, आजी-माजी शिक्षक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत. संस्थेच्या प्रगतीसाठी अनेक माजी विद्यार्थ्यांनी योगदान दिले असून, मोठ्या प्रमाणावर देणगी संकलनही करण्यात आले आहे.

संस्थेच्या यशस्वी वाटचालीसाठी विद्यमान चेअरमन गिरीश नारखेडे, खजिनदार डॉ. चंद्रकांत नारखेडे, सचिव रमेशदादा बोरोले आणि शालेय समितीचे चेअरमन डॉ. शशिकांत नारखेडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

१२ मार्च रोजी होणाऱ्या अमृत महोत्सवी समारंभात सर्व विद्यार्थ्यांनी, माजी विद्यार्थ्यांनी, पालकांनी व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post