जळगाव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजने अंतर्गत काही अपात्र महिलांना मानधन दिले गेले हे मानधन शासनाने परत घेऊ नये या संदर्भात धरणगाव तालुका तहसीलदार श्री महेंद्र सूर्यवंशी साहेब यांना उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील साहेब यांच्या नेतृत्वात शिवसेना परिवार व महिला मंडळा तर्फे निवेदन देण्यात आले दोन-तीन दिवसा पासून मीडियावर या संदर्भात उलट सुलट चर्चा ऐकायला मिळत आहे लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले जाणार आहेत त्यामुळे अनेक महिलांनी आमच्याकडे तक्रारी केल्या या संदर्भात तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले. तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना सुद्धा निवेदन देण्यात आले असून पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्याशी शिष्टमंडळ चर्चा करणार आहे.
या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर,महिला तालुका प्रमुख पुष्पाताई पाटील,तालुका प्रमुख मोहन हरी पाटील,युवा सेना उपजिल्हा प्रमुख बंटी पाटील,महिला तालुका प्रमुख प्रियंका कोळी,तालुका संघटक हेमंत भाऊ चौधरी,साखरे ग्रामपंचायत सदस्य भाऊ गुजर,माजी सरपंच खरेदे कैलास पाटील,नांदेड येथील बीजेपीचे सुनील अत्तरदे,बीजेपीचे भरत भाई भाटिया कार्यकर्ते व पदाधिकारी व लाडक्या बहिणी उपस्थित होते.
Post a Comment