Top News

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा !...


धरणगाव - शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी शाळेचे उपशिक्षक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( बी.एल.ओ.) पी डी पाटील यांनी मतदानाचे महत्त्व सांगून आपण सर्व भारतीय आहोत धर्म, भाषा, वंश, जात, पंथ कुठेही मधे न येता आपण नि :पक्षपातीपणे मतदानाला सामोरे जाऊन कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडावे. सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या गावात - शहरात जनजागृती करावी व मतदानाचे महत्त्व आपल्या पालकांना देखील समजून सांगावे अशा सूचना विद्यार्थ्यांना दिल्या.
         याप्रसंगी पी डी पाटील यांच्या पाठोपाठ सर्व विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय मतदार प्रतिज्ञा घेण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार, बी एल ओ एम बी मोरे, एम के कापडणे, एस व्ही आढावे, एस एन कोळी, एच डी माळी, व्ही टी माळी, एम जे महाजन, व्ही पी वऱ्हाडे, लिपिक जे एस महाजन, पी डी बडगुजर, ग्रंथपाल व बी.एल.ओ.जी पी महाजन, सेवक अशोक पाटील, जीवन भोई उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post