Top News

शिवसेना परिवारातर्फे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन सादर..


जळगाव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजने अंतर्गत काही अपात्र महिलांना मानधन दिले गेले हे मानधन शासनाने परत घेऊ नये या संदर्भात पालकमंत्री मा श्री गुलाबराव पाटील साहेब यांना उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील साहेब यांच्या नेतृत्वात शिवसेना परिवार तर्फे निवेदन देण्यात आले दोन-तीन दिवसा पासून मीडियावर या संदर्भात उलट सुलट चर्चा ऐकायला मिळत आहे लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले जाणार आहेत त्यामुळे अनेक महिलांनी आमच्याकडे तक्रारी केल्या या संदर्भात पालकमंत्री यांना लेखी निवेदन देण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना सुद्धा निवेदन देण्यात आले.
            या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर,पवन पाटील कार्यकर्ते व पदाधिकारी व लाडक्या बहिणी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post