महागाव | प्रतिनिधी श्री सुरज पवार
महागाव बस स्थानकाचे नियंत्रक बी. डी. पारवेकर यांचा वाढदिवस दिनांक ६ जुलै २०२६ रोजी मित्रपरिवार, सहकारी व चाहत्यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थितांनी "जीवेत् शरदः शतम्" या मंगलमय शुभेच्छांसह पारवेकर यांना निरोगी, दीर्घायुषी व यशस्वी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या कार्यात व जीवनात सातत्याने प्रगती होऊन उत्तुंग यशाची गगनभरारी लाभो, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
बी. डी. पारवेकर हे आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे सर्व स्तरातील नागरिकांमध्ये लोकप्रिय आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांशी प्रेमाने व आपुलकीने वागणारे तसेच कर्तव्यनिष्ठपणे एसटी सेवेत कार्य करणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव करत मित्र, सहकारी व स्नेही परिवाराने त्यांचा वाढदिवस आनंदात साजरा केला.
यावेळी जगदीश महाराज पिंपरीकर, आर. बी. बोरसे सर, पी. आर. मुधळ सर, माधव आगोसे, सौ. अनुपमा ताई रोकडे, गुणाजी रोकडे यांच्यासह अनेक मान्यवर व चाहत्यांनी पुष्पगुच्छ देऊन पारवेकर यांचा सत्कार केला व वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
Post a Comment