Top News

स्व. सौ. जयश्री संजय हर्षे यांच्या पुण्यतिथीनिमित्त गरजूंना रेनकोट वाटप.


ब्रह्मपुरी, प्रतिनिधी :
स्वर्गीय सौ. जयश्री संजय हर्षे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मानव कुटी, ब्रह्मपुरी (जिल्हा चंद्रपूर) यांच्या वतीने दिनांक १ जुलै २०२६ रोजी गरजू नागरिकांसाठी रेनकोट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
माजी आमदार माननीय श्री अतुल देशकर ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार मा. श्री. अतुल देशकर साहेब, ब्रह्मपुरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मा. श्री. योगेश मिसर तसेच सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार, कवी व अभिनेते, सनातन सारथी युट्यूब चॅनेलचे प्रतिनिधी आणि वसंत गीतांजली काव्यसंग्रहाचे संपादक मा. श्री. सुरज सुधाकरराव पवार (यवतमाळ) उपस्थित राहणार आहेत. मान्यवरांच्या हस्ते गरजू नागरिकांना रेनकोटचे वाटप करण्यात येणार आहे.
माननीय श्री योगेश मिसर नगराध्यक्ष ब्रम्हपुरी जी चंद्रपूर
प्राचार्य डॉक्टर संजय हर्षे
स्व. सौ. जयश्री संजय हर्षे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या उपक्रमाद्वारे सामाजिक बांधिलकी जपत गरजू घटकांना मदत करण्याचा मानव कुटीचा प्रयत्न आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रेनकोट वाटप हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन मानव कुटीचे संचालक प्राचार्य डॉ. संजय सुशीला प्रभाकर हर्षे यांनी केले आहे. समाजोपयोगी कार्यात सहभागी होऊन या उपक्रमास सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले.
प्रतिनिधी -श्री सुरज सुधाकरराव पवार

Post a Comment

Previous Post Next Post