Top News

वसंत गीतांजली कविता संग्रहाचे प्रकाशन; साहित्य क्षेत्रात उत्साह


यवतमाळ प्रतिनिधी :
पत्रकार तथा कवी सुरज सुधाकरराव पवार संपादित ‘वसंत गीतांजली’ या कवितासंग्रहाचे नुकतेच महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमामुळे साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या कवितासंग्रहाच्या निमित्ताने कवी सुरज पवार यांनी सुप्रसिद्ध साहित्यिक पंजाबराव चव्हाण यांची भेट घेत त्यांना ‘वसंत गीतांजली’ पुस्तक भेट दिले. यावेळी पंजाबराव चव्हाण यांनी या संग्रहातील कवितांबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया देत, नवोदित कवींना प्रोत्साहन देणारा हा एक उत्कृष्ट उपक्रम असल्याचे सांगितले.

‘वसंत गीतांजली’ या कवितासंग्रहातून विविध सामाजिक, भावनिक आणि प्रेरणादायी विषयांवर आधारित कविता सादर करण्यात आल्या असून वाचकांकडूनही याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या विशेष प्रसंगी संबंधित प्रतिक्रिया आणि अधिक माहिती पाहण्यासाठी सनातन सारथी न्यूज यूट्यूब चॅनलवर प्रतिनिधी सुरज सुधाकरराव पवार यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post