महागाव प्रतिनिधी : श्री. सुरज पवार
सुप्रसिद्ध पत्रकार तथा कवी सुरज सुधाकरराव पवार यांचा महागाव येथे सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. स्वर्गीय सुधाकरराव पवार लिखित “हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक” यांच्या जीवनकार्यावर आधारित “वसंत गीतांजली” या कवितासंग्रहाचे संपादन सुरज पवार यांनी केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच मुंबई येथे महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या हस्ते झाले.
या उल्लेखनीय कार्याबद्दल सुरज पवार यांचा महागाव येथे ज्ञानेश्वर काप्रतवार (तालुका संघटक, आर्य वैश्य समाज) तसेच सामाजिक कार्यकर्ते विलास फकीरराव पवार (मुडाणा) यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थितांनी सुरज पवार यांच्या साहित्यिक व पत्रकारितेतील कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Post a Comment