धाराशिव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित ३२वे अखिल भारतीय मराठी नवोदित साहित्य संमेलन २९ व ३० मे २०२६ रोजी धाराशिव येथे पार पडत आहे. देशभरातील कवी व कवयित्रींचा या संमेलनात मोठ्या उत्साहात सहभाग अपेक्षित आहे.
सहभागी कवी-कवयित्रींना कविता वाचनासाठी २९ मे रोजी प्रत्यक्ष नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नोंदणी करताना पूर्व यादी क्रमांक व पूर्व नोंदणी क्रमांक नमूद करणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. प्रत्यक्ष केलेली नोंदच अंतिम मानली जाणार असून त्यात कोणताही बदल केला जाणार नाही. तसेच पूर्व नोंदणी नसलेल्या कवींना संधी दिली जाणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे.
पूर्व नोंदणीची अंतिम मुदत २७ मे २०२६ असून सर्व साहित्यिकांनी २८ मे रोजी संमेलन स्थळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विविध सत्रांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन विविध बोलीभाषा व साहित्यिक अभिव्यक्तीचा आस्वाद घ्यावा, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी सर्व साहित्यिकांना संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
धाराशिव येथे ३२वे अखिल भारतीय मराठी नवोदित साहित्य संमेलन उत्साहात
Sanatan Sarthi News
0
Post a Comment