Top News

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांचा छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य सत्कार


प्रतिनिधी : सुरज पवार, छत्रपती संभाजीनगर | दिनांक : ३० मे २०२६

छत्रपती संभाजीनगर येथे आज सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय शिरसाठ यांचा शिवसैनिक व युवा सेना कार्यकर्त्यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
या प्रसंगी ओबीसी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या उपाध्यक्षा मनीषाताई राठोड यांनी शाल व श्रीफळ देऊन मंत्री संजय शिरसाठ यांचा सत्कार केला. कार्यक्रमात शहराध्यक्ष सुनीता कोकाटे, शीतल देवधर तसेच कुमारी पायल सुभाष राठोड यांची विशेष उपस्थिती लाभली.
संत एकनाथ रंगमंदिर येथे सायंकाळी ६ वाजता पार पडलेल्या या सत्कार सोहळ्यात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे आणि विकासकामांच्या माध्यमातून जिल्ह्याला नवी दिशा देणारे नेतृत्व म्हणून संजय शिरसाठ यांचे कार्य यावेळी गौरविण्यात आले.
कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात या सोहळ्याला उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेत्याचा सन्मान केला.
विशेष प्रतिनिधी : सुरज सुधाकरराव पवार
सनातन सारथी न्यूज, यूट्यूब चॅनल

Post a Comment

Previous Post Next Post