Top News

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारण्याची मागणी — धरणगावातील महिलांचा मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

धरणगाव (प्रतिनिधी) — महिलांच्या शिक्षणक्रांतीसाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक धरणगाव शहराच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात यावे, अशी मागणी शहरातील महिलांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. या निवेदनात धरणगाव-जळगाव रस्त्यावरील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीजवळील स्व. यादवराव अण्णांच्या इमारतीसमोरील मोकळ्या जागेत भव्य स्मारक उभारावे, अशी मागणी नमूद करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले यांनी उभ्या केलेल्या स्त्री शिक्षणाच्या प्रकाशपथाला आजही समाज मार्गदर्शक मानतो. त्यामुळे अशा महान कार्यकर्त्रीचे स्मारक धरणगावात उभे राहणे काळाची गरज असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. निवेदन देताना सौ. संगीता संजय महाजन, सौ. पुष्पाताई ज्ञानेश्वर महाजन, सौ. उषाताई गुलाबराव वाघ, सुरेखाताई विजय महाजन, सौ. अंजलीताई भानुदास विसावे, सौ. कल्पनाताई विलास महाजन, सौ. संगीताताई चंदन पाटील, सौ. मनीषा कैलास माळी, सौ. प्रमिलाताई मधुकर रोकडे, सौ. सरलाताई सुरेश सावकारे, सौ. संगीताताई विनोद माळी, सौ. संगीताताई देवालाल माळी, सौ. भारतीताई हेमंत चौधरी, सौ. सुनीताताई संतोष लिंडायत, सौ. कविताताई रमेश महाजन, सौ. उषाताई मनोज चौधरी, सौ. रिटाताई भागवत आदी महिला उपस्थित होत्या. महिला वर्गाच्या या स्तुत्य उपक्रमामुळे शहरात स्मारक उभारणीचा मुद्दा ऐरणीवर आला असून, प्रशासन याकडे सकारात्मक भूमिका घेईल अशी अपेक्षा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post