Top News

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.


पाळधी, 21 जून 2025 (शनिवार) – इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल, पाळधी येथे आज आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 9 वाजता शाळेच्या प्रांगणात सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सूर्यनमस्काराने करण्यात आली. शाळेच्या शिक्षिका सौ. उज्वला होले आणि कु. भाग्यश्री पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध योग क्रिया शिकवल्या. विद्यार्थ्यांनी देखील अत्यंत आनंदाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने योगाभ्यास केला.

प्रायमरी विभागातील विद्यार्थ्यांनी म्युझिकल एरोबिक्सचे आकर्षक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

शाळेचे चेअरमन इंजि. श्री. नरेश चौधरी यांनी 'योगाला आपली जीवनशैली बनवा' असा महत्वाचा संदेश दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना सात्विक आहार घेण्याचे आणि नियमित योगाभ्यास करण्याचे महत्त्व पटवून दिले.

कार्यकारी संचालक श्री. जी.डी. पाटील यांनी योग आणि अभ्यास यामधील संतुलनाचे महत्व स्पष्ट केले. प्राचार्य श्री. विवेक रुपनर यांनी योग दिनाचे महत्व अधोरेखित करून विद्यार्थ्यांना योगाचा जीवनातील फायदा समजावून सांगितला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सौ. रोहिणी सोमानी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post