Top News

20 जून रोजी धरणगाव उपजिल्हा रुग्णालयाचा शुभारंभ, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती.

धरणगाव (प्रतिनिधी) – धरणगाव शहरात 20 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ख्वाजाजी नाईक स्मारक व 40 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या उपजिल्हा रुग्णालयाचा शुभारंभ होणार आहे. याबाबतची माहिती जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

पालकमंत्री पाटील यांनी 13 जून रोजी धरणगाव येथे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री साहेबांच्या या दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महायुतीच्या या बैठकीस भाजपचे ज्येष्ठ नेते डी. जी. पाटील, सुभाष अण्णा पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, भाजप उपजिल्हा प्रमुख संजय महाजन, राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वर महाजन यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीचे प्रास्ताविक भाजप माजी तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन युवा सेनेचे भैय्या मराठे यांनी केले. व्यासपीठावर पी. सी. आबा पाटील, गजानन पाटील, देविदास पाटील, मुकुंद भाऊ नन्नवरे, शिवराज पाटील, पवनभाऊ सोनवणे, भानुदास आप्पा विसावे, राजूभाऊ चव्हाण, भाजप महिला जिल्हा सरचिटणीस प्रमिला ताई रोकडे, तुषार महाजन, भाजप तालुका प्रमुख दिनेश पाटील, शहर प्रमुख दिलीप महाजन, विलास महाजन यांची उपस्थिती होती.

शिवसेना-भाजप महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आणि युवक मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post