आमदार राजू मामा भोळे यांनी दिल्या शुभेच्छा !
जळगाव- फोंडा, गोवा येथे सनातन संस्थेच्या वतीने १७ ते १९ मे या कालावधीत 'सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी आज सकाळी 9 वाजता, जळगाव रेल्वे स्थानकावरून जिल्ह्यातील शेकडो हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते गोवा एक्स्प्रेसने रवाना झाले. यावेळी जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे मामा हे निरोप देण्यासाठी उपस्थित होते. या वेळी ते म्हणाले की, सनातन शंखनाद महोत्सव हा आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारा मोठा सोहळा असून तुमच्यासह देशातील सर्व संत, महंत, शंकराचार्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील हिंदुत्ववादी नेते, कार्यकर्ते सहभागी होणार आहे. या सोहळ्याला मी मनापासून शुभेच्छा देतो. आपण सुखरूप पणे "अखंड हिंदु राष्ट्र शंखनाद महोत्सव" साजरा करावा ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो. यावेळी "जयतु जयतु हिंदु राष्ट्र, हर हर हर महादेव, जय श्रीराम" या घोषणा देण्यात आल्या. तसेच दुसरी टीम 15 मे ला रात्री भुसावळ रेल्वे स्थानकावरून मंगला एक्सप्रेसने निघणार असून, जिल्ह्यातील सर्व हिंदू धर्मप्रेमी, कार्यकर्ते रवाना होणार आहेत.
Post a Comment