Top News

भुसावळ-धरणगाव-अमळनेर-पुणे नवीन रेल्वे गाडी सुरू करण्याबाबत खासदार स्मिताताई वाघ व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन.


धरणगाव | प्रतिनिधी

खान्देश प्रवासी असोसिएशन, धरणगाव यांच्यातर्फे भुसावळ-धरणगाव-अमळनेर-पुणे मार्गावर नवीन रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी करत एक निवेदन नुकतेच खान्देशचे लोकप्रिय खासदार श्रीमती आ. स्मिताताई वाघ तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांच्याकडे सादर करण्यात आले.

खान्देशमधील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील प्रवाशांच्या वाढत्या समस्यांचा विचार करता ही गाडी सुरू होणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सदर गाडी भुसावळहून सुरु होऊन धरणगाव, अमळनेर, नंदुरबार, वसई रोड, पनवेल, लोणावळा मार्गे पुण्यापर्यंत चालवावी किंवा पर्यायी मार्गाने नंदुरबारहून सुरू होऊन अमळनेर, धरणगाव, जळगाव, मनमाड मार्गे पुणेपर्यंत नेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

ही मागणी खान्देश प्रवासी असोसिएशनचे अध्यक्ष कमलेश तिवारी, उपाध्यक्ष चंद्रकांत भावसार, सचिव श्रेयांस जैन, सहसचिव ॲड. नंदन पाटील, खजिनदार प्रतीक जैन तसेच सदस्य युवराज रायपूरकर, दिनेश पाटील, प्रशांत भाटिया, नारायण महाजन, संभाजी सोनवणे व जतीन नगरिया यांनी संयुक्तपणे केली आहे.

स्थानिक नागरिकांनी या मागणीला जोरदार पाठिंबा दर्शवला असून खान्देश परिसरातील प्रवाशांना दिलासा मिळावा यासाठी रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post