Top News

निशाने गावातील इलेक्ट्रिक पोल तात्काळ उभे करण्यात यावे शिवसेना महिला तालुका प्रमुख पुष्पाताई पाटील यांची मागणी


धरणगाव तालुक्यातील निशाने गावाला लागून अनेक इलेक्ट्रिकचे पोल हे नादुरुस्त झाले असून इलेक्ट्रिक तार अक्षरशा जमिनीपासून चार पाच फूट अंतरावर लटकलेले आहेत ही अवस्था गेल्या दीड दोन वर्षां पासून याकडे दुर्लक्ष केले जात आहे अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा कोणीही लक्ष द्यायला तयार नाही आता पावसाळा लागेल त्या ठिकाणी काही अपरिचित घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण राहील काही जीवित हानी झाली तर  पाळीव प्राणी आहे गाई म्हशी नेहमी शेतात ये जा करीत असतात तारांमध्ये पावसाळ्यात करण उतरल्यास जीवित हानी होऊ शकते तरी संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पाहणी करून तात्काळ पोल दुरुस्त करावेत अशी मागणी शिवसेना महिला तालुका प्रमुख पुष्पाताई पाटील यांनी केली आहे अन्यथा शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल.

Post a Comment

Previous Post Next Post