Top News

खान्देश प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश

खान्देशातील प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. खान्देश प्रवासी असोसिएशनच्या मागणीवरून आणि खासदार आ. स्मिताताई वाघ यांच्या विशेष प्रयत्नांमुळे 09051/52 दादर-भुसावळ स्पेशल एक्सप्रेस (सोम, बुध, शनि) 30 जून 2025 पर्यंत तर 09049/50 दादर-भुसावळ स्पेशल एक्सप्रेस (दर शुक्रवार) 28 जून 2025 पर्यंत धावणार आहे.

खान्देश प्रवासी असोसिएशनने खान्देशातील प्रवाशांच्या सोयीसाठी या रेल्वे गाड्या कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची मागणी पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर आणि DRM यांच्याकडे केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेची मुदत वाढविण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वेने जानेवारी 2023 मध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही गाडी सुरू केली होती. खान्देशातील प्रवाशांचा या ट्रेनला मोठा प्रतिसाद मिळाल्याने तिची मुदत 27 व 31 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र, प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता, ती आता 30 जून 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

खान्देश प्रवासी असोसिएशनचे अध्यक्ष कमलेश तिवारी, उपाध्यक्ष चंद्रकांत भावसार, सचिव श्रेयांस जैन, सहसचिव ऍड. नंदन पाटील, खजिनदार प्रतीक जैन तसेच सदस्य युवराज रायपूरकर, दिनेश पाटील, प्रशांत भाटिया, संभाजी सोनवणे, नारायण महाजन, जतिन नगारीया आणि खान्देशातील तमाम प्रवाशांनी खासदार स्मिताताई वाघ तसेच पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी दररोज संध्याकाळी 6.50 वाजता धरणगाव व अमळनेर येथून ट्रेन उपलब्ध आहे. जास्तीत जास्त प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रवासी असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post