मुंबई, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष माजी समाजकल्याण मंत्री मा. बबनरावजी घोलप यांनी आज विधान भवनात सामाजिक न्याय मंत्री मा. संजय शिरसाठ यांची भेट घेतली. या भेटीत महासंघाच्या विविध सामाजिक प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच, मागील अधिवेशनात मुंबई व नागपूर येथे काढण्यात आलेल्या मोर्चांबाबतही मंत्र्यांसमोर मुद्दे मांडण्यात आले.
यावेळी मा. बबनराव घोलप यांनी या प्रश्नांवर लवकरात लवकर मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक घेऊन निर्णय घ्यावा अशी मागणी केली. त्यावर मंत्री संजय शिरसाठ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व विषयांवर लवकरच बैठक बोलावली जाईल असे आश्वासन दिले.
बैठकीला अनेक मान्यवर उपस्थित
या चर्चेसाठी विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये मा. मंत्री संजयभाऊ सावकारे, मंत्री अशोकराव माने, आमदार नारायण कूचे, तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी भानुदास विसावे (राष्ट्रीय कार्याध्यक्ष), सरोजताई बिसुरे (राष्ट्रीय अध्यक्ष महिला आघाडी), ज्ञानेश्वर कांबळे (राष्ट्रीय सचिव), दत्तात्रेय गोतीशे (राष्ट्रीय सचिव), उमाकांत डोईफोडे (राष्ट्रीय सचिव), अनिल कानडे (राष्ट्रीय सचिव), राजेंद्र नेटके (प्रदेश सचिव) व मुंबई अध्यक्ष यांचा समावेश होता.
सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच उच्चस्तरीय बैठक
या बैठकीनंतर राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या प्रतिनिधींनी सरकारकडून मिळालेल्या आश्वासनाबाबत समाधान व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच होणाऱ्या बैठकीत समाजाच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा महासंघाने व्यक्त केली आहे.
Post a Comment