धरणगाव येथील,श्री स्वामी समर्थ आध्यत्मिक आणि बालसंस्कार सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) धरणगाव. जि. जळगांव. येथे परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे व आदरणीय दादासाहेब नितीन दादा मोरे यांच्या मार्गदर्शनाने दिनांक 12 जानेवारी, 2025 रविवार रोजी सकाळी 8:30 ते दुपारी 02 .00 या वेळेत केंद्रात बालसंस्कार विभाग अंतर्गत बालसंस्कार हिवाळी शिबिर घेण्यात आले. त्यात सुमारे 125 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सर्वप्रथम विद्येची देवता सरस्वती मातेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सूर्यनमस्कार ओंकार प्राणायाम, तसेच अध्यात्मिक सेवा त्यात स्वामी स्तवन, गणपती अथर्वशिर्ष गणपती स्तोत्र प्रज्ञाविवर्धन स्तोत्र रामरक्षा गायत्री मंत्र गणेश गायत्री मंत्र सूर्य मंत्र स्मरणशक्ती वाढवणारे स्तोत्र व मंत्र पठण करण्यात आले व यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच आदर्श दिनचर्या व पंचांद्रियांच्या महत्त्व विशद करण्यात आले बाल संस्कार व्हिडिओ सादरीकरण करण्यात आले तसेच विविध स्टॉल प्रात्यक्षिक व प्रशिक्षण देण्यात आले स्वसंरक्षण तसेच गुड टच आणि बॅड टच विषयी संपूर्ण माहिती देण्यात आली,
विविध स्पर्धेत मुलं - मुली यांनी भाग घेऊन यश संपादन केले. त्यांना बक्षीस मान्यवरांचा हातून देऊन गौरविले. नंतर पसायदान व राष्ट्रगीताने कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली व सर्वांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला.कार्यक्रम यशस्वी साठी तालुका केंद्र प्रमुख श्री आर. पी. पाटील सर, राकेश मकवाणे साहेब, सौ. सुलोचना मकवाने बालसंस्कार तालुका प्रतिनिधि प्रवीण बडगुजर चंदाताई पवार दिनेश सूर्यवंशी व केंद्रातील सर्व कार्यरत सेवेकरी परिवाराने श्रमिक सहकार्य केले
तसेच धरणगावं व धरणगावं तालुक्यातील सर्व साप्तहिक सेवा केंद्रात सुमारे 1111 पाठ शाकंभारी नऊरात्री निमित्त दुर्गा शप्तशती पाठ करण्यात आले.. शाकंभारी पौर्णिमेच्या निमित्ताने धरणगावं केंद्रात शाकंभारी माता स्वरूप श्री स्वामी समर्थ महाराजांना सकाळी 10:30 च्या नैवेद्य आरतीला 64 राण भाज्यांच्या नैवेद्य दाखविण्यात आला. संपूर्ण तालुक्यातील सर्व माता भगिनींनी सेवेकारी परिवाराने मोठया संख्येने सहभाग घेऊन महा प्रसादाचा लाभ घेतला.
.jpg)

Post a Comment