Top News

🚨 अमळनेर हादरले! सातवीतील मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपी अटकेत 🚨


📍 अमळनेर (प्रतिनिधी) : शहरातील गांधलीपुरा (मातंग वाडा) परिसरात सातवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्पर कारवाई करत आरोपीला अटक केली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील व भाऊ कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. घरात केवळ मुलगी व तिची आजीच उपस्थित होत्या. याच संधीचा गैरफायदा घेत आरोपी शिल्या उर्फ साहिल रफीक शेख (रा. गांधलीपुरा) याने २५ मे रोजी पहाटे सुमारास घरात घुसखोरी केली. झोपेत असलेल्या मुलीच्या खाटेजवळ जाऊन त्याने तिच्यावर गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, आवाज ऐकून जागी झालेल्या आजीने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला रंगेहाथ पकडले. मात्र झटापटीत आरोपीने आजीला ढकलून दिले व घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेनंतर धैर्य दाखवत पीडित मुलीने आजीसह थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४, ७५, ७६, ३३३ तसेच पोक्सो कायदा २०१२ अंतर्गत कलम ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम राबवत फरार आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे अमळनेर शहरात संतापाचे वातावरण असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ⚖️🔥

Post a Comment

Previous Post Next Post