Top News

जळगाव ग्रामीण मतदार संघातील ३३३३ वारकरी पंढरपूरला रवाना...

जळगाव ग्रामीणचे आमदार, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या सहकार्याने व या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने जळगाव ग्रामीण मतदार संघातील ३३३३ वारकरी दिनांक १६ जून रोजी जळगाव येथून रेल्वेने पंढरपूरला रवाना झाले. या सर्व वारकऱ्यांचे आशीर्वाद घेऊन गुलाबराव पाटील साहेब व शिवसेना परिवाराचे सर्व पदाधिकारी त्यांना पोहोचवण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

अतिशय उत्साही वातावरणामध्ये सर्वांनी त्यांना आपला प्रवास सुखाचा होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. रेल्वे स्टेशनवर जवळजवळ दोन तास पालकमंत्री व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. प्रत्येकाच्या डब्यामध्ये जाऊन त्यांचे विचारपूस करून त्यांना आवश्यक तो औषधोपचार देऊन डॉक्टर टीम, कार्यकर्त्यांची टीम २४ डब्यांची रेल्वे स्वतंत्र गुलाबराव पाटील साहेब यांनी आपल्या स्वखर्चातून उपस्थित करून दिली होती.

मागच्या वर्षी सुद्धा ५५ बसेस, ५००० वारकरी जळगाव ग्रामीणचे गेले होते. यावर्षी सुद्धा वारकऱ्यांच्या आग्रहास्तव मंत्री महोदय गोरगरीब वारकरी ज्यांना पंढरपूरच्या दर्शन घेणे अडचणीचे ठरते अशा वारकऱ्यांच्या सुद्धा त्यात सहभाग आहे. जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वात संपूर्ण २४ डब्यांचे नियोजन करण्यात आले असून प्रत्येक डब्यामध्ये एक प्रमुख व त्याच्यासोबत श्रीकांत शिंदे साहेब फाउंडेशन तर्फे मोफत औषधाची व्यवस्था करण्यात आली आहे.

दोन दिवसांचा हा प्रवास असून सकाळी नाष्टा, दुपारी जेवण, रात्री जेवण, राहण्याची, झोपण्याची, प्रवासाची सर्व व्यवस्था पालकमंत्र्यांनी केली आहे. जळगाव रेल्वे स्थानकावर सर्व ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ महिला, युवक, युती महिला मंडळ अतिशय आनंदी वातावरणामध्ये भजन म्हणत, गाणे म्हणत आपला प्रवास करीत आहेत. सर्वांच्या चेहऱ्यावर अतिशय आनंदी वातावरण दिसत आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्यासोबत जळगाव जिल्ह्यातील शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भाऊ भंगाळे, महिला जिल्हा प्रमुख सरिता ताई माळी, उपजिल्हा प्रमुख माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील सर, जि. प. सदस्य प्रतापराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य पवन भाऊ सोनवणे, जळगाव तालुका प्रमुख शिवराज पाटील, देविदास पाटील, युवा सेना जिल्हा प्रमुख रोहित कोगटा, मनोज भाऊ चौधरी नगरसेवक, पप्पू भाऊ भावे गटनेते, धरणगाव शहर प्रमुख विलास भाऊ महाजन, वाल्मीक दादा पाटील, विश्वनाथ भाऊ पाटील, नवल पाटील, सुमित परदेशी, अजय पाटील, पवन भाऊ महाजन, मच्छिंद्र पाटील, प्रशांत देशमुख, सरपंच उगलाल पाटील, किशोर पाटील, माजी सैनिक अरविंद मानकरी, नाटेश्वर पवार, संजय महाजन, सागर पाटील, गणेश भाऊ कोळी, धनराज भाऊ कासट, आबा माळी, ग्रामीण भागातील कार्यकर्ते पदाधिकारी, सरपंच तुषार महाजन, असोदा सदस्य दीपक पाटील, मेजर प्रवीण पाटील, अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post