पाळधी बुद्रुक (ता. धरणगाव) – दिनांक १६ जून २०२५ रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी मुलांची केंद्र शाळा पाळधी बुद्रुक येथे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आ. नामदार श्री. गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी हा आनंददायी आणि प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि शिक्षणाविषयी सकारात्मक भावना तयार व्हावी, यासाठी विशेष आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास ग्रामपंचायतचे मा. सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, मदतनीस तसेच गावातील सर्व मान्यवर आणि पालकांची उपस्थिती अपेक्षित आहे.
📌 कार्यक्रमाची वेळ: सकाळी ९:३० वाजता
📌 स्थळ: जि. प. उच्च प्राथमिक मराठी मुलांची केंद्र शाळा, पाळधी बुद्रुक, ता. धरणगाव
कार्यक्रमास केंद्रप्रमुख श्री. प्रमोद सोनवणे, मुख्याध्यापक श्री. एन. के. देशमुख (केंद्र शाळा), श्री. अकिल सर (उर्दू बॉईज), पटेल जहाँआरा (उर्दू कन्या) तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित राहणार आहेत.
सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून नवागत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Post a Comment