Top News

धरणगाव : शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी व कर्जमाफीच्या मागणीसाठी उ.बा.ठा शिवसेनेचे निवेदन

धरणगाव/प्रतिनिधी : मागील काही कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे व दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तर्फे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफीची सुविधा द्यावी, अशी मागणीचे निवेदन धरणगाव तहसीलदारांना देण्यात आले.

यावेळी धरणगाव शहरातील व तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, गारपीट व पाणीटंचाईमुळे मोठा आर्थिक फटका बसला असून शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

शिवसेनेच्या प्रतिनिधीनी तहसीलदारांना निवेदन सादर करताना, "शेतकऱ्यांच्या वेदना आम्ही थांबवू, शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे तत्काळ लक्ष द्यावे अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल," असा इशारा दिला.

Post a Comment

Previous Post Next Post