यावल (प्रतिनिधी) – यावल तालुका उ.बा.ठा. शिवसेना ची महत्वपूर्ण बैठक आज खरेदी-विक्री संघाच्या सभागृहात नवनियुक्त उ.बा.ठा. शिवसेना उपनेते व रावेर लोकसभा सहसंपर्क प्रमुख श्री. गुलाबराव वाघ यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात उत्साहात पार पडली.
बैठकीच्या प्रारंभी श्री. गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख श्री. दीपकसिंग राजपूत आणि युवासेनेचे श्री. चंद्रकांत शर्मा यांचा यावल शहर व तालुका उ.बा.ठा. शिवसेना च्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री. गुलाबराव वाघ यांनी शिवसैनिकांना पक्ष बळकटीसाठी अधिक जोमाने कार्य करण्याचे आवाहन केले. पक्ष वाढवण्यासाठी जनतेत जावून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे निर्देश त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिले.
बैठक प्रास्ताविक व आभार प्रदर्शन उ.बा.ठा. शिवसेना शहरप्रमुख श्री. जगदीश कवडीवाले यांनी केले. बैठकीस उपजिल्हाप्रमुख गोपाळ चौधरी, तालुका प्रमुख रवींद्र सोनोवणे, उपतालुका प्रमुख शरद कोळी, डी. एम. पाटील सर, किरण साळुंखे, संतोष धोबी, पप्पू जोशी, शकील पटेल, आदिवासी सेनेचे हुसेन तडवी, शिवाजी नगरचे दगडू पाटील, निलेश पराशर, न्हावीचे सरपंच देवेंद्र चोपडे, नितीन इंगळे, हमीद पटेल, प्रमोद तळेले, अजहर खाटीक, इमियास शेख, कपिल शेख मन्यार, पिंटू कुंभार, विजू कुंभार, सुरेश कुंभार, योगेश राजपूत पाटील, योगेश चौधरी, प्रल्हाद बारी, पंकज बारी, कडू पाटील, प्रविण लोणारी, न्हावीचे चेतन इंगळे, विलास चौधरी, प्रकाश वाघ, सारंग बेहेडे, संतोष वाघ, आर. के. चौधरी सर, विरावलीचे संजय मोतीराम पाटील, विजय कवडीवाले आदी मोठ्या संख्येने उ.बा.ठा. शिवसेना चे शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत एकमताने ठराव करण्यात आला की पक्ष बळकटीसाठी उ.बा.ठा. शिवसेना चे शिवसैनिकांनी संघटनेला अधिक बळकट करून जनतेच्या प्रश्नांसाठी सज्ज राहावे आणि आवश्यक तेथे आंदोलने करून जनतेला न्याय मिळवून द्यावा.
Post a Comment