Top News

श्री संत ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांची श्री स्वामी समर्थ महाराज सेवा केंद्रात भेट.

धरणगाव (प्रतिनिधी):
श्री बालाजी नगर, धरणगाव येथील प्रसिद्ध श्री संत ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. तात्यासो हिरालाल महाराज यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे विद्यार्थी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, दिंडोरी प्रणित, धरणगाव येथे भेटीस आले. श्रीमद् भागवत एकादशी निमित्त आज रविवार, सकाळी ८.०० वाजता भूपाळी आरती कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती लावली.

आरतीनंतर विद्यार्थ्यांनी गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे तोंडी पठण माईकवर सादर केले. या अध्यात्मिक वातावरणात सर्वांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले. या प्रसंगी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने सेवा केंद्रातील सेवेकऱ्यांच्या हस्ते 'श्री स्वामी समर्थ नित्यसेवा स्तोत्र मंत्र' ग्रंथ विद्यार्थ्यांना भेट म्हणून देण्यात आला.

या उपक्रमामागे विद्यार्थ्यांच्या अध्यात्मिक प्रगतीसाठी व त्यांच्या जीवनात सद्गुणांची वृद्धी व्हावी, यासाठी विशेष हेतू होता. उपस्थित सेवेकरी परिवाराने विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले.

यानंतर सामुदायिक ७०० श्लोकी श्रीमद् भागवत पारायण उत्साहात पार पडले. भागवत एकादशी निमित्त अखंड दिवसभर दरबारात विनावादन सेवा सुरू आहे. या निमित्ताने परिसरात पवित्र अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post