पाळधी, ता. ६ मे — आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पाळधी परिसरात अचानकपणे आलेल्या मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यामुळे परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला. काही ठिकाणी झाडे रस्त्यावर कोसळली, ज्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
वादळी वाऱ्याच्या जोरामुळे अनेक घरांच्या छप्परांना फटका बसला असून शेतीचीही मोठ्या प्रमाणात हानी झाली असल्याची माहिती समोर येत आहे. काही भागांमध्ये वीज पुरवठाही खंडित झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले असून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात येत आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment