Top News

हिंदु राष्ट्र शंखनाद महोत्सवासाठी गोव्यात गेलेल्या अ‍ॅड. निरंजन चौधरी यांनी मडगाव स्थानकावरील दुर्दशा पाहून रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले | सनातन सारथीचे किरण माळी यांचेही तत्पर ट्विट

प्रतिनिधी – सनातन सारथी न्यूज | दिनांक – १९ मे २०२५

मडगाव (गोवा) – हिंदु राष्ट्र शंखनाद महोत्सवासाठी जळगाव येथून गोवा येथे आलेले अ‍ॅड. निरंजन चौधरी यांनी मडगाव रेल्वे स्थानकावरील अपंग प्रवाशांसाठीच्या शौचालयाची अत्यंत दयनीय अवस्था पाहून तातडीने व्हिडीओद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

शौचालयाचे कुलूप तुटलेले असून, स्वच्छतेचा पूर्ण अभाव आहे. याशिवाय प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील छतामधून पावसाचे पाणी थेट गळत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या समस्येवर सनातन सारथी न्यूजचे प्रतिनिधी किरण माळी यांनीदेखील तत्परता दाखवत व्हिडिओ ट्विटद्वारे ही गंभीर बाब रेल्वे मंत्रालय व मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
RailwaySeva ने ट्विटरद्वारे दोघांच्या तक्रारीची नोंद घेत, संबंधित अधिकाऱ्यांना सूचित केले असून RailMadad पोर्टलवरही तक्रार नोंदवली गेली आहे. तक्रारीचा क्रमांक SMS द्वारे पाठवून पुढील कार्यवाहीसाठी यंत्रणा सक्रिय झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post