पाळधी - इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे आज, मंगळवार दि. 01 एप्रिल 2025 रोजी नवीन शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिक्षणाची गुढी उभारून ज्ञानार्जनाच्या नव्या पर्वाला सुरुवात केली.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी शिक्षणातील कौशल्ये, शिस्त, प्रामाणिकपणा, ज्ञान आणि संस्कार यांचा स्वीकार करण्याची शपथ घेतली. शाळेचे प्राचार्य श्री. विवेक रुपनर यांनी नवीन शैक्षणिक वर्ष, नवीन आर्थिक वर्ष आणि नवीन मराठी वर्ष यांची सांगड घालत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या महत्वाची जाणीव करून दिली.
कार्यक्रमास शाळेचे अध्यक्ष नरेश चौधरी, संचालक जी. डी. पाटील, प्राचार्य श्री. विवेक रुपनर, सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते. गुढी पूजनानंतर विद्यार्थ्यांनी एकमेकांना नवीन मराठी वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि आपल्या नवीन वर्गात प्रवेश केला.
शाळेच्या या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढवण्यास मदत होणार असून, नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले आहे.
Post a Comment