धरणगाव रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी खुशखबर आहे. मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार तसेच वाशिम, हिंगोली, नांदेड आणि हैद्राबाद कडे धावणाऱ्या तीन गाड्यांचे थांबे धरणगाव स्टेशन येथे मंजूर करण्यात आले आहेत.
या गाड्यांचे थांबे मंजूर:
1️⃣ वलसाड - दानापूर एक्सप्रेस (09025/26)
प्रवासी मार्ग: जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, प्रयागराज, पं. दीनदयाल उपाध्याय, बक्सर, आरा, दानापूर
सुत्रसंचालन सुरू: 25 मार्चपासून
09025: दर मंगळवार, दुपारी 1:34 वा. (दानापूरकडे)
09026: दर बुधवार, दुपारी 4:30 वा. (वलसाडकडे)
2️⃣ बांद्रा - रेवा जनसाधारण एक्सप्रेस (09129/30)
प्रवासी मार्ग: जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, कटनी, सतना, रेवा
सुत्रसंचालन सुरू: 28 मार्चपासून
09129: दर शुक्रवार, दुपारी 1:34 वा. (रेवाकडे)
09130: दर शनिवार, सकाळी 3:32 वा. (बांद्राकडे)
3️⃣ राजकोट - महबूबनगर एक्सप्रेस (09575/76)
प्रवासी मार्ग: भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, काचीगुडा, महबूबनगर
सुत्रसंचालन सुरू: 25 मार्चपासून
09575: दर मंगळवार, सकाळी 3:42 वा. (महबूबनगरकडे)
09576: दर बुधवार, दुपारी 4:42 वा. (राजकोटकडे)
खान्देश प्रवासी असोसिएशनचा पुढाकार
या महत्वपूर्ण निर्णयासाठी खान्देश प्रवासी असोसिएशनचे अध्यक्ष कमलेशदादा तिवारी, उपाध्यक्ष चंद्रकांत भावसार, सचिव श्रेयांस जैन, सहसचिव ऍड. नंदन पाटील, खजिनदार प्रतीक जैन आणि सदस्य युवराज रायपूरकर, दिनेश पाटील, प्रशांत भाटिया, नारायण महाजन, संभाजी सोनवणे, जतीन नगारिया यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
यासाठी खासदार मा. स्मिताताई वाघ यांचे खान्देश प्रवासी असोसिएशन व धरणगाववासियांकडून विशेष आभार मानण्यात येत आहेत.
प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांनी या सोयीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment