Top News

संत व महात्म्यांचे कार्य सर्व समाजाला प्रेरणादायी ह.भ.प गजानन जी महाराज. काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाचा समारोप.


धरणगाव - सामाजिक रचनेत संत व महात्म्यांनी उभे केलेले कार्य हे सर्व समाजाला दिशादर्शक व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन वरसाडे येथील गोप्रेमी गजानन जी महाराज यांनी धरणगाव येथील माऊली वारकरी शिक्षण संस्था हनुमान नगर धरणगाव येथे नुकत्याच झालेल्या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनाच्या समारोप प्रसंगी केले.
         आपल्या दोन तासाचे कीर्तनात गजानन महाराजांनी संतांनी गेल्या सातशे वर्षांपूर्वी समाजासाठी दिलेले योगदान व समरसतेच्या कार्याला उजाळा दिला.
          नुकताच सालाबादप्रमाणे यावर्षी येथील स्वा सुकनिवासी सद्गुरु जोग महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा माऊली वारकरी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे सांगता झाली हा सप्ताह 6 फेब्रुवारीपासून सुरू होता.
          या सप्ताह कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार सहभागी झाले. संजय नाना महाराज धोंडगे नाशिक ज्ञानेश्वर महाराज कोठुळे मुंबई युवा कीर्तनकार कृष्णा महाराज पुंड अहिल्यानगर भागवताचार्य परमेश्वर महाराज उगले तळवाडे नांदगाव युवाचार्य संतोषजी महाराज आढावणे भोकरदन विनोदाचार्य गंगाराम महाराज राऊत पैठण ज्ञान सिंधू ज्ञानेश्वर महाराज जळकेकर 14 फेब्रुवारी रोजी गोप्रेमी गजानन जी महाराज वरसाडेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने समारोप करण्यात आला. काल्याच्या कीर्तना समारोप प्रसंगी वारकरी संस्थेच्या वतीने पुढच्या वर्षी होणाऱ्या 36 व्या होणाऱ्या सप्ताह साठी किर्तन सेवेचे यजमान तसेच या सप्ताह कार्यक्रमात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला.त्यांना श्रीफळ देऊन त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला.
      या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एक लाख रुपयांची भरीव मदत केली. सत्ताह काळात विविध सामाजिक राजकीय अध्यात्मिक भाविकांनी आपल्या आपल्या परीने मदत केली. 
        संस्थेला मदत करण्याचे आवाहन. 
याप्रसंगी माऊली वारकरी संस्थेचे अध्यक्ष 1008 महामंडलेश्वर भगवान बाबा यांनी जाहीर आवाहन केले की संस्थेमध्ये 60 ते 65 विद्यार्थी गोरगरीब विद्यार्थी व अनाथ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अशा विद्यार्थ्यांना कपडे व शालेय साहित्य तसेच ज्या भाविकांना आपल्या वाढदिवसानिमित्त अन्नदान व आर्थिक देणगी स्वरूपात काही मदत करायची असल्यास संस्थेत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
              धरणगाव ते श्री क्षेत्र मुक्ताई पायी दिंडी निघण्याची दिनांक 17 फेब्रुवारी 2025 सोमवार रोजी सकाळी 8 वाजता असेल तरी भाविकांनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे

Post a Comment

Previous Post Next Post