Top News

आपत्ती व्यवस्थापनात समाजासाठी विद्यार्थ्यांची भूमिका मोलाची - प्राचार्य डॉ. अरुण जैन


प्रताप महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न 

अमळनेर - येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात दिनांक 28 जानेवारी रोजी प्रताप महाविद्यालय व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने समूह सहभागिता कार्यक्रमांतर्गत आयोजित शालेय सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. अरुण जैन उपस्थित होते. त्याचप्रमाणे संस्थेचे सहसचिव डॉ. धीरज वैष्णव व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण प्रशिक्षण कार्यशाळा समितीचे प्रमुख श्री. सतीश कांबळे तसेच श्री. रविंद्र पाटील व आपदा मित्र आकाश चौधरी उपस्थित होते.
       जळगाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे जळगाव जिल्ह्यात विविध शाळा महाविद्यालयांमध्ये शालेय सुरक्षा प्रशिक्षण अंतर्गत कार्यशाळांचे आयोजन केले जात आहे. त्याच अनुषंगाने दिनांक 28 जानेवारी रोजी प्रताप महाविद्यालय अमळनेर येथे सदर कार्यशाळेचे आयोजन केले गेले. या कार्यशाळेस जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची 12 सदस्यीय समितीने महाविद्यालयात विद्यार्थ्यांसमोर आपत्ती व्यवस्थापनाची विविध प्रात्यक्षिके करून दाखवली. त्यात आगीपासून बचाव कसा करावा, पुर परिस्थितीत जीव कसा वाचवावा, आपत्ती काळात शाळेमधून विद्यार्थ्यांची सुटका कशी करावी, उंच इमारतीवरून जमिनीवर कसे उतरावे, रस्ते अपघातामध्ये अपघातग्रस्तांची मदत कशी करावी अशा अनेक प्रकारच्या आपत्तींमधून सुटकेचे प्रात्यक्षिके सादर केली तसेच विद्यार्थ्यांकडूनही करून घेतली. 
        सदर कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी खानदेश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त सौ. वसुंधरा लांडगे तसेच राजेंद्र देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण जैन, कुलसचिव राकेश निळे, रुसा समन्वयक डॉ. मुकेश भोळे आदी उपस्थित होते. महाविद्यालयातील सर्व विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांचीही उपस्थिती लाभली. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. जयेश साळवे, संरक्षण व सामारिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रवींद्र मराठे, प्रा. भाग्यश्री पाटील, प्रगती पाटील, हर्षदा शिंदे, हर्षाली चौधरी, हर्षा पाटोळे, ममता पाटोळे, ज्योती पडूल, उषा मोरे तसेच संदीप बिऱ्हाडे, रेहान मुजावर यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post