स्वराज्य निर्माते छत्रपती शिवराय अष्टावधानजागृत शस्रास्त्रशास्त्र पारंगत, निश्चयाचा महामेरू व्यक्तिमत्त्व होते. --- मुख्याध्यापक एस डी मोरे
साळवे इंग्रजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय साळवे तालुका धरणगाव येथे शिवजयंती निमित्त शिवचरित्रावर उत्कृष्ट भाषणे विद्यार्थ्यांनी केली. मानसी पाटील, पूर्वा पाटील, दिशा पाटील, देवश्री बाविस्कर व तनुजा पाटील हिने शिवाजी महाराजांवर उत्कृष्ट पोवाडा गायन केला. आठवी ब च्या विद्यार्थ्यांनी शिवजन्मापासून राज्याभिषेकापर्यंत उत्कृष्ट अशी प्रबोधनात्मक नाट्यछटा सादर केली. सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून उत्कृष्ट अभिनय करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर गिरीश नारखेडे हे होते. त्यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. नाट्यछटेतील बाल शिवाजी, शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन बी आर बोरोले यांनी केले. नाट्यछटा साठी मार्गदर्शन रंजना नेहेते व प्रतिभा पाटील यांनी केले. भाषणांची तयारी एन बी पाटील व वर्षा नेहेते यांनी केली. इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. सर्व विजेत्या स्पर्धकांना व उत्कृष्ट अभिनय करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आले.
Post a Comment