Top News

सारजाई कुडे व बालकवी विद्यालयात श्रीराम मंदिर वर्धापन सोहळा संपन्न.

------------------------------------------------------------------
धरणगाव- येथील सारजाई कुडे व बालकवी विद्यालयात आज 22 जानेवारी रोजी प्रभू रामचंद्रांच्या राममंदिराला एक वर्ष पूर्ण झाल्याने,राममंदिर वर्धापन सोहळा विद्यार्थ्यांच्या मुखरुंदातून रामरक्षा पठाणाने संपन्न झाला.निवृत्त संस्कृत शिक्षक एम.जी.उपासनी यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन संस्थेचे उपाध्यक्ष चिंतामण पाटील यांनी स्वागत केले.यावेळी मुख्याध्यापक जीवन पाटील व मुख्याध्यापक एस एस पाटील उपस्थित होते. प्रसंगी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी प्रभू श्री रामाविषयी सुंदर गीतांचे गायन केले. प्रास्ताविक श्री किशोर चौधरी यांनी तर सूत्रसंचालन व आभार श्री परमेश्वर रोकडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख वाय पी पाटील व सदस्य यांनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post