दि. 08 जून रोजी शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाचा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेचे अध्यक्ष इंजि नरेश चौधरी, कार्यकारी संचालक गजानन पाटील, यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी शाळेत फुलांचे सुंदर असे सजावट करण्यात येऊन, छोटा भीम, मिकी माउस स्वरूपात विद्यार्थ्यांचे मनोरंजन करण्यात आले.
यावेळी शाळेचे प्राचार्य आर एल माळी, शारदा पाटील, भाग्यश्री आळंदे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांमध्ये नव्या वर्गात प्रवेश, नवीन पुस्तके व मित्रांच्या भेटीमुळे आनंदाचे वातावरण दिसून आले.
शाळेत विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा कटिबद्ध असल्याचे यावेळी प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साह, आनंद व सकारात्मक वातावरणात झाल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.
Post a Comment