Top News

पाळधी येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने, व्याख्यानाला उपस्थित राहण्याचे आवाहन.


पाळधी येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने, संस्थापक पू. भिडे गुरुजी यांच्या प्रेरणेने, छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे वैशिष्ट्य:
छत्रपती संभाजी महाराजांनी फाल्गुन शु. १ ते फाल्गुन अमावस्यापर्यंत चाळीस दिवस नरक यातना सहन करूनही धर्माचा त्याग केला नाही. या अद्वितीय बलिदानाच्या स्मृतीप्रीत्यर्थ धर्मवीर बलिदान मास पाळण्यात येत आहे.

मुख्य वक्ते:
श्री अक्षयजी चंदेल
(वर्धा येथील शिवचरित्र व्याख्याते आणि धारकरी)
यांचे शौर्य जागवणारे मार्गदर्शन अनुभवण्याची संधी.

कार्यक्रमाचा तपशील:
दिनांक: २७ फेब्रुवारी २०२५ (गुरुवार)
वेळ: सायंकाळी ७:०० वाजता
स्थळ: मुख्य आठवडे बाजार मैदान, भगवा चौक, पाळधी

आवाहन:
तालुक्यातील सर्व शिवप्रेमी हिंदू बांधवांनी या प्रेरणादायी व्याख्यानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

जय भवानी! जय शिवाजी!
धर्मवीर संभाजी महाराज की जय!

Post a Comment

Previous Post Next Post