कोल्हापूर येथे महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी काम करणाऱ्या 42 संघटनांची मराठा आरक्षण संदर्भात व मराठा समाजाला मिळणाऱ्या विविध योजना संदर्भात व त्यांना न्याय मिळण्या संदर्भात महाराष्ट्र राज्य परिषद दिनांक 23 रोजी कोल्हापूर येथील सर्किट हाऊस येथे आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी मनोज जरांगे पाटील सोडून राज्यातील 42 संघटना एकत्र आल्या होत्या त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर प्रमुख मागण्या मान्य करण्यासाठी सरकार सोबत चर्चा करून मराठा समाजाला न्याय मिळावा लढत राहण्यापेक्षा उपोषण करण्यापेक्षा आपल्या पदरात आपल्या मागण्या मान्य करून घ्याव्यात अशी सर्वत्र बैठकी चर्चा झाली. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील माजी नगराध्यक्ष अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष पी एम पाटील सर यांची अखिल भारतीय मराठा सेवा संघ आरक्षण समितीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष विजय राजे महाडिक सांगली यांनी त्यांच्या सत्कार केला.
या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश प्रमुख पदाधिकारी नितीन डांगे पाटील,प्रशांत पवार,जगदीश जाधव,रावसाहेब पाटील,दीपिका पाटील,रेखाताई पाटील,पुष्पाताई पाटील, रंजनाबाई पाटील,महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते पी एम पाटील साहेब यांच्या निवडी बद्दल त्यांच्या सत्कार करण्यात आला.
Post a Comment