वृक्ष म्हणजे पर्यावरण संवर्धनाचे साधन होय-- वनपरिक्षेत्र अधिकारी क्षीरसागर.
धरणगाव प्रतिनिधी -
आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त साळवे इंग्रजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, साळवे ता धरणगाव च्या प्रांगणात धरणगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी- एन एन शिरसागर, वनपाल- सतीश ठेलार, वनरक्षक थोरकर साहेब, योगेश पाटील, वनसेवक- शांताराम पाटील, विलास मराठे, गजानन पाटील, सागर झुंजारराव, मगन मराठे इत्यादी वन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहाने विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षांची लागवड केली व ते संगोपन करून वाढवण्याची जबाबदारी सर्व कर्मचाऱ्यांनी घेतली.
वृक्ष रोपणानामुळे पर्यावरणाचे संवर्धन होते, हवा शुद्ध होण्यास मदत होते, ऑक्सिजन मिळतो, जमिनीत पाणी साठा वाढण्यास मदत होते, वृक्षांपासून विविध वनौषधी मिळतात, वृक्षांपासून विविध संसार उपयोगी वस्तू तयार होतात व जळण म्हणून वृक्षांच्या सुद्धा वापर होतो. असे बहुउपयोगी साधन म्हणजे वृक्ष होय त्याचे संवर्धन करणे ही सगळ्यांची जबाबदारी आहे असे वन परीक्षेत्र अधिकारी श्री एन एन क्षीरसागर यांनी सांगितले.
याप्रसंगी मुख्याध्यापक श्री एस डी मोरे म्हणाले वृक्षांमुळे आपल्याला फुले, फळे, सावली, गारवा आणि शुद्ध हवा व ऑक्सिजन मिळण्यास मदत होत असते. म्हणून वृक्षांचे संवर्धन करणे, वृक्ष वाढवणे, काळजी घेणे, ही सर्वांची महत्त्वाची जबाबदारी आहे. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक जी व्ही नारखेडे, व्ही के मोरे, एस व्ही राठोड, दिगंबर पाटील, ज्येष्ठ शिक्षिका नीता पाटील, रंजना नेहेते, प्रतिभा पाटील, पौर्णिमा वारके, वर्षा नेहेते आणि शिक्षकेतर कर्मचारी प्रदीप अत्तरदे, रणधीर पाटील, ललित भारंबे, अनुपम अत्तरदे, गुलाब पाटील, रवींद्र पाटील, आदींनी परिश्रम घेतले. वृक्षारोपण करून ते जगवणे व वाढवण्याची जबाबदारी सर्वस्वी विद्यार्थ्यांच्या मदतीने करण्याचे आश्वासन दिले.
Post a Comment