पाळधी येथील सोनार वाडा येथे दिनांक 16.01.2025 ते 23.01. 2025 रोजी श्रीशिव महापुराण कथा आयोजित करण्यात आली होती.
कथा प्रवक्ता- ह.भ.प श्री ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर हे होते.
गायनाचार्य:- परमेश्वर महाराज पाळधीकर करण सिंग महाराज आळंदी
सिंधवादक:- हनुमंत महाराज गरताड
ऑक्टोपॅड:- लालाजी महाराज कुकाणे
तबला:- चेतन महाराज शिरपूरकर
मृदुंगचार्य :- बारकू महाराज वावडेकर
झाकी :- सुरज महाराज पांडुरना महाराज
कार्यक्रमाची रूपरेषा अशी होती.
सकाळी 5 ते 6 काकड आरती, संध्या 5 ते 6 हरिपाठ, रात्री 8 ते 11 शिवपुराण कथा
महाराजांनी सात दिवसापर्यंत भगवान महादेवाचे महत्त्व सांगितलं आणि बारा ज्योतिर्लिंगांचे महत्त्व देखील सांगितले हिंदू बांधवांमध्ये जागृती निर्माण व्हावी यामध्ये धर्म बंधू-भगिनींना धर्मबोध सुद्धा दिला 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिर वर्धापन दिवसानिमित्त शंभू श्री ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य अशी प्रभू श्रीराम यांची शोभायात्रा व ग्रंथ मिरवणूक गावातून काढण्यात आली या मिरवणुकीचे विशेष आकर्षण म्हणजेच हनुमंतांची झांकी आणि प्रभू श्रीरामचंद्रांची झांकी होती. व शिवपुराण कथेचा 23 तारखेला समारोप करण्यात आला. व महाप्रसादाचे वितरण केले तसेच शिवनेरी मित्र मंडळातर्फे शंभू श्री ज्ञानेश्वर महाराज यांना लव जिहाद ग्रंथ भेट देऊन त्यांच्या सन्मान करण्यात आला.
भव्यदिव्य अशा कार्यक्रमाचे आयोजक शिवनेरी मित्र मंडळ व प्रभाकर माळी उर्फ बापू हे होते.
Post a Comment