Top News

बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

धरणगाव येथील बालकवी  ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर पोवाडे व त्यांच्या ऐतिहासिक कारकिर्दीबद्दल माहिती सांगितली .कार्यक्रमाप्रसंगी भारत माता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक जीवन पाटील यांनी केले व प्रतिमांना  माल्यार्पण मुख्याध्यापक एस एस पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रमुख वाय पी पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक समितीचे सदस्य व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post